जागतिक मानसिक आरोग्य दिवस
जागतिक मानसिक आरोग्य दिवस
प्रा. पवार अलोक अर्जुन अलका
प्राचार्य, स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज
धनकवडी, पुणे - ४११ ०४३
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर २०२० संपन्न होणाऱ्या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ...
एखादा व्यक्ती जेंव्हा स्वतःला तंदुरुस्त समजतो तेंव्हा तो शाररीक दृष्ट्या समोरून कसा दिसतो, त्याच्या शरीरास कोणता आजार नाही ना, तो जिम ला जातो त्याची तब्बेत देखील व्यवस्थित आहे इतकेच पुरे नसते तर त्याचे मानसिक आरोग्य म्हणजे 'मन' देखील उत्तम अवस्थेत असणे गरजेचे आहे.
![]() |
| माझ्या मनाच्या तीन अवस्था |
आपल्या शरीरातील एखादा अवयव त्रास देत असेल तर त्याच शरीराच्या भागावर उपचार घेणे सहज शक्य होते. मात्र मन हे याच बाबतीमध्ये हेलकावे खाणारे असते त्याला नक्की काय वेदना होत आहेत का हेच कळत नसेल तर उपचार करणे तितकेच अशक्य आणि अवघड होते. त्यामुळे शाररीक वेदनेसोबत मानसिक म्हणजेच मनाच्या वेदना लक्षात घेणे हे देखील गरजेचे आहे. पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती या मानसिक आरोग्यावर गंभीर परिमाण करणारी अशी दिसून येते. म्हणजे आधी एकत्रित कुटुंब पद्धती अस्तित्वात होत्या ज्यामध्ये सर्व लोक कुटुंबातील सर्वांकडे लक्ष देण्यास सक्षम होत्या. सध्याची विभक्त कुटुंब पद्धती ही तितकीच या बाकीच्या जगापासून स्वत:कडे वेगळ्या नजरेने बघते. स्वत:चे एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्याच्या गडबडीत ते अस्तिव समाजाला पाहिजे त्या स्वरुपात निर्माण नाही झाले तर या विभक्त कुटुंबातील सदस्य कावरे बावरे होतात आणि तेथूनच त्याची मानसिक आरोग्याशी लढा देण्याची तयारी सुरू होताना दिसते.
मानसिक आरोग्य कोठेही कोणत्याही प्रकारे हेलकावे खाऊ शकते. म्हणजे घरी कुटुंबियांकडून होणाऱ्या दबावाला अनुसरून, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या दबावाला अनुसरून किंवा दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे नाहीत आणि त्या आपण मिळवू शकतो या जिद्दी पायी होणाऱ्या घटना असफल झाल्यास जे नैराश्य येत ते कुठेतरी मानसिक आरोग्य खराब करण्याच्या दिशेने जाते.
कोरोनाच्या कालावधीत माणसे कमवायचे, ते कमविणे कसे योग्य आहे, घरी बसून काम, मग ते काम कसे होते, आपल्याला येणारे लाईट बिल योग्य आहे कि अयोग्य, मी बाहेर पडूच शकणार नाही का? मग माझ्या जीवनात अंधकारच आहे का? अशा अनेक गोष्टींनी भांबावलेला असा दिसून येतो. मानसिक आरोग्याला या कालावधीत नेहमीच काम करण्याची सवय नाही त्यामुळे ते इकडे तिकडे जे सैरावैरा धावायला लागले आहे ते कुठेतरी थांबून त्याची जडणघडण आपल्या हातात आहे हे लक्षात आले पाहिजे. हा कालवधी संपल्यावर आपण काय काय करू शकतो याच्या विविध संकल्पना आपल्याला कळल्या तर एक नवीन प्रेरणा मिळू शकते आणि एक नवीन उमेद देखील येऊ शकते. या जागतिक मानसिक आरोग्य दिवशी हेच तर आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की आपल्याला आपले मानसिक आरोग्य तर सांभाळायचे आहे शिवाय आपल्या सभोवती जे नैराश्यग्रस्त लोक आहेत त्यांनाही तोच आधार देऊन त्यांची मानसिकता, तिला धीर देणे गरजेचे आहे. नेहमीच परिस्थिती सारखी नाही राहत. कधीतरी समाधानी परिस्थिती देखील येऊ शकते त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये आपले मानसिक आरोग्य आपणास मजबूत ठेवून पुढे भविष्य बनवूयात. शाररीक व्यायाम केल्यास मनाचा व्यायाम करणे म्हणजेच मनात कोणत्याही चुकीच्या गोष्टींना ताबा मिळवून न देणे इतकेच करणे.
पवार अलोक अर्जुन अलका
एम.एस्सी. (संगणक शास्त्र), एम.बी.ए. (माहिती तंत्रज्ञान), एम. एस्सी. संप्रेषण - भौतिक शास्त्र, एम.फील. (माहिती तंत्रज्ञान), स्त्रिया आणि विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रम, लिंगभाव आणि विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रम, समुपदेशक प्रमाणपत्र अभ्यासक्रम
९७६५७१०७७८

Very informative & detailed... Self reflecting during Covid-19 pandemic
ReplyDeleteIt's very true sir related to our current situation 👌👌
DeleteNice sir ....
ReplyDeleteVery apt sir it truly represents what we all are undergoing. It is high time due consideration is given to mental health of a person. Anxiety and insecurity are the two main contributors to mental health and if they are addressed at the right time the person is likely to overcome the situation.
ReplyDelete